पोरका (Poraka)

ebook (झाडीबोली कथासंग्रह) (Collection of Zadiboli Dialect stories)

By मा. तु. खिरटकर (M. T. Khiratkar)

cover image of पोरका (Poraka)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

मा. तु. खिरटकर यांच्या या नऊही कथांचा मागोवा घेतला असता असे आढळून येते की या सर्व कथा झाडीपट्टीच्या वातावरणातच गुरफटलेल्या आहेत. प्रादेशिक कथा कशी असावी याचा आदर्श म्हणून या कथासंग्रहाकडे बिनधास्तपणे अंगुलीनिर्देश करता येईल. किंबहुना ग्रामीण कथा साहित्यातही या संग्रहामुळे मोलाची भर पडणार आहे. आजच्या कथाविषयक मानदंडांची कोणतीच जाणीव नसताना खिरटकरांनी केलेला हा प्रयत्न बुद्धिपुरस्सर केलेल्या यातायातीपेक्षा वेगळा आणि म्हणूनच लक्षणीय ठरतो. कोणताही प्रतिथयश कथाकार आणि त्याचा आदर्श समोर नसताना केली गेलेली ही कथानिर्मिती म्हणूनच अस्सल झाडीबोलीचे बावनखणी लेणे ठरते. समीक्षकांनी खुशाल आपल्या मोजपट्ट्या लावाव्यात. त्यांची पर्वा नि खंत या कथाकाराला नाही. तो तर झाडीपट्टीतील सोने साऱ्या मराठी जगताला वाटायला सज्ज झालेला आहे.

म्हणूनच खास झाडीबोलीचा लटका आणि झटका असलेल्या ह्या कथा अखिल मराठी माणसाला आपल्या वाटतील असा विश्वास आहे. खिरटकरांचा 'पोरका' हा कथासंग्रह पोरका नसून आम्हा सर्वांचा आहे याची ग्वाही आपण तो स्वीकारून द्यावी अशी माफक अपेक्षा करून हे आपुलकीचे बोलणे संपवितो.

- डॉ. हरिश्चंद्र बोरकर

पोरका (Poraka)