राबता (समिक्षा ग्रंथ) Rabata (Literary Criticism)
ebook ∣ झाडीबोली (Zadiboli Dialect)
By डॉ. घनश्याम डोंगरे (Dr. Ghanshyam Dongre)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
माझे पती, स्वर्गवासी डॉ. घनश्याम डोंगरे म्हणजे सतत धडपडणारे व्यक्तीमत्व जीवनात अनेक चढउतार आले. कधी चांगले तर कधी वाईट अनुभव आले. पण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी साहित्याबद्दलची आपली अभ्यासु वृत्ती ढळू दिली नाही. चार वर्षे सतत 'झुळझुळ च्या माध्यमातून खेडयापाडयांतील साहित्यीकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांना प्रसिद्धी दिली. त्यांच्या कलागुणांना पारखून त्यांना प्रसिद्धीच्या मार्गावर नेले. 'झाडीबोली साहित्य मंडळाद्वारे' झाडीबोलीची सेवा त्यांनी केली. झाडीबोलीचे महत्व पटवून दिले. स्वबळावर अपार मेहनमत घेवून त्यांनी नागपूर विद्यापिठातून पीएच.डी. मिळवली. हे एक आज उदाहरण आहे. झाडीबोलीच्या आठ महाण स्तंभाच्या काव्यसंग्रहांचे समीक्षण करून लवकरच ते पूस्तकरुपाने प्रकाशीत करण्याचा त्यांचा विचार त्यांच्या हयातीत अपूर्ण राहिला.
त्यांचे पुस्तक आज 'राबता' नावाने आपल्यासमोर ठेवण्याचे कार्य नियतीने माझ्यावर सोपवले ते मी आज पूर्ण करित आहे. हे कार्य करतांना मी कोणत्या कठीण परिस्थितीत होते हे माझे मलाच माहित पण त्यांची पुण्याई आणि काही व्यक्तींच्या सहकार्यांतून मी हे कार्य पूर्ण करू शकली...
या पुस्तक तयार करण्याच्या कामात श्री. वसंत चन्ने यांचे सहकार्य फार मोलाचे आहे. मी पूर्णपणे खचलेल्या मन:स्थितीत होती. अश्या वेळी श्री. चन्ने यांनी हे कार्य स्वतः च्या बळावर पूर्ण केले. त्यांचे माझ्या पतीवरचे 'लक्ष्मण प्रेम' राबताच्या पान्यापान्यातून आपल्या समोर आहे. मा. डॉ. हरिश्चंद्र बोरकर, मा. हिरामण लांजे यांनी मला मुलीप्रमाणे धिर दिला आणि या कामात मदत केली. त्यांचे ऋण मानुन त्यांची महत्ता मी कशी कमी करू? डॉ. हरिश्चंद्र बोरकरांचे स्मरण संवाद हा या पुस्तकाला मिळालेला आशिर्वादच आहे. प्रल्हाद पिल्लारे, सौ. कल्पना वानखेडे यांची सुद्धा या कार्यात महत्वाची मदत मिळाली. या शिवाय या कार्यात ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तीची मदत झाली. त्या सर्वांचे ऋण विसरणे शक्य नाही.
- रेणू डोंगरे