वैनेची थोरवी (Vainechi Thorvi)

ebook झाडीबोली काव्यसंग्रह (Collection of Zadiboli Dialect Poems)

By डॉ. घनश्याम डोंगरे (Dr. Ghanshyam Dongre)

cover image of वैनेची थोरवी (Vainechi Thorvi)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

झाडीबोली चळवळीतील एक म्हत्वपूर्ण व्यक्तीमत्व म्हणजे स्व. डॉ. घनश्याम सदाशीव डोंगरे. खरे पाहता झाडीबोलीतील सशक्त कथाकार म्हणुन त्यांची ओळख होती. नाशीकच्या युगांतर प्रतिष्ठाने त्यांच्या 'वास्तुक' कथासंग्रहाला 'बंधु माधव' पुरस्काराने सन्मानीत केले होते. त्यांच्या 'भाराटी' या कादंबरीला झाडीबोलीतील पहिली कादंबरी म्हणुन मान्यता मिळाली होती. 'ओळख' या सहा कवींच्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कविता प्रशिद्ध झाल्या होत्या. 'झुळझुळ' या मराठी मासीकाचे संपादक म्हणुन ते संपूर्ण महाराष्ट्रात परीचित होते. 'झुळझुळ' च्या माध्यमातून त्यांनी झाडीबोलीतील अनेकांचे साहित्य प्रशिद्ध करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. वऱ्हाडी आणि झाडी बोलींचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी पीएचडी मिळवली होती. झाडीबोली साहित्य संमेलनांच्या आठ पूर्वाध्यक्षांच्या कवितासंग्रहाचे समीक्षण त्यांनी 'राबता' या समीक्षा ग्रंथातून केले होते.

'वैनेची थोरवी' हा त्यांचा कवीता संग्रह त्यांच्या मरणानंतर आज सात वर्षांनी प्रकाशीत होत आहे. यात त्यांच्या ३७ कविता आणि ११४ चारोळ्यांचा समावेश केला आहे. झाडीपट्टीचा सुगंधी गोडवा या कवितांतून दळवळतो. ग्रामीण जीवनातील दैनंदीन गरजा भागवतांना होणारी तारांबळ या कवितातून जाणवते. 'आखाळ लागलं', 'धान मांगजा', 'वाट वावराची धर', 'किरसानाच्या लेकराय व्हा' अशा कवितांतून अस्सल ग्रामीन चित्र डोळ्यासमोर साकारते. (प्रस्तावनेतून)

वैनेची थोरवी (Vainechi Thorvi)