झाडपी माणसं (Zadpi Mansa)

ebook (झाडीबोली नाटक) (Zadiboli Dialect Drama)

By गणपती रामदास वडपल्लीवार (Ganapati Ramdas Wadpalliwar)

cover image of झाडपी माणसं (Zadpi Mansa)

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

नाटककार गणपतराव वडपल्लीवार यानी झाडीपट्टी रंगभूमी परिक्षेत्रात खलनायक व चरित्र नाट्य अभिनेता म्हणून विविध नाटकातून विविध भूमिका सादर केल्या. सन २०११-१२ साली त्यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलावंत गौरव पुरस्कार मिळताच त्यांच्या कला अविष्कार क्षेत्रात विशेष भर पडली त्यामुळे त्यांचे नाट्य-कलावंत समालोचन निश्चीतच गौरवास्पद आहे.

त्यांचे प्रकाशित पहिले नाटक 'मातामाईचा मूंज्या' महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय साहित्य आणि संस्कृती मंडळ या शासनाचे अनुदानाने प्रकाशित झालेले आहे. अंधश्रद्धा व अस्पृशोद्धार या सामाजिक समस्याधारीत या नाटकाला नाट्य लेखनाचे 'उत्कृष्ठ लेखन' पुरस्कार प्राप्त झाले म्हणून त्यांच्या नाट्य लेखनात लौकीका अर्थी भर पडताच त्यांची लेखन-प्रेरणा वृद्धीगंत णाली त्याचेच एक प्रतिक म्हणून प्रकाशित होणारे त्यांचे दुसरे नाटक 'झाडपी माणसं' होय.

आदीवासी जिल्ह्यातील झाडपी बोल भाषेत हे नाटक लिहले आहे. साध्या भोळ्या, श्रद्धाळू घरंदाज पाटलांचा बाहेरून आलेल्या उपया पोटभरू समाज कंटकांनी गैरफायदा घेतला. त्यांच्या जीवना वाताहात केली याचे वास्तवादी चित्र नाटककारानी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याकरिता नाट्य प्रवेशानुक्रमातील त्यांनी रेखाटलेले प्रसंग झाडीपट्टीतील जीवन दर्शन प्रेक्षकांनी दाखविण्यास यशश्वी झाले आहेत.

झाडीपट्टीचे लोक रिवाज, नक्षलवाद, दारूच्या व्यसनाने झालेली अधोगती यांचे सादरीकरण रेखाटलेले खटकेबाज संवाद, झाडीपट्टीतील लोकगीते, पाटीलकीच्या मोठेपणात विविध पदावर असणारा येथील पाटील गैरविश्वासाने स्वथात कसा करवून घेतो यांचे जीवंत चित्रण तसेच झाडपी बोलभाषेने निर्माण झालेले विनोद हे नाटक उत्तम प्रायोगिक असल्याचे समर्थन देते.

नाटकाराचे उर्वरित इतर काही नाटके आर्थिक प्रतीकुलतेमुळे प्रकाशनाची वाट पाहत आहेत, त्यांचे प्रकाशनार्थ नव-स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. एका माझ्या या वर्गमित्रास भविष्य कालीन शुभकामना देतो.

- हरीराम आ. वरखडे गुरुजी

माजी आमदार तथा अध्यक्ष

कलावंत मानधन निवड समिती

जिल्हा परिषद, गडचिरोली.

झाडपी माणसं (Zadpi Mansa)