गुंता मनाचा (Gunta Manacha)
ebook ∣ (काव्यसंग्रह) (Collection of Poems)
By राधिका जाधव-अनपट (Radhika Jadhav-Anpat)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
भारत देशाच जगात उठून दिसाणारं वैशिष्ट्य म्हणजे साहित्य, कला, संस्कृती अन् ज्ञान या गोष्टीची जाण उच्च शिक्षित किंवा थोर अभ्यासकालाच होऊ शकते असा आपला गोड गैरसमज होऊ शकतो. त्यात एक म्हणजे साहित्य क्षेत्रात झेप घ्यायची म्हणजे सर्वांग ज्ञान प्राप्ती करून गाढा अभ्यास असणे आवश्यक असते. त्यासाठी अनेक पदव्या धारण करून त्यायोगे साहित्य क्षेत्राचे पद्य असो की, गद्य त्याचा मनात विचार येणे सहाजिक आहे. परंतु वरिल पैकी कोणत्याहि क्षेत्रात मनसोक्त सहभाग नोंदवावा ही कांही पुरूषांचीच मक्तेदारी नाही हे दाखवुन देण्याचे काम मोठ्या कष्टाने, जिद्दीने, एका अल्प शिक्षित महिलेन केलेले दिसते ते 'गुंता मनाचा' या काव्यसंग्रहातुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेच तर 'गुंता मनाचा' या काव्यसंग्रहाची नावान बालिश वाटणारी राधा ची राधिका झाली आणि मनाचा विरंगुळा म्हणून रेडिओची गाणी ऐकत ऐकत लिखाणाचा छंद जोपासला. तिचा छंद जोपासण्यासाठी तिचा पती अशोक (मनानं सम्राट) मोठे दीर ज्योतिराम आण्णा व तिच्या कुटूंबानी तिच्या मनाला उभारी दिली. अन् मग राधिकाची धारदार लेखी सरसाऊन धावली. तेंव्हाच राधिकानं 'शोध माणसातील माणसाचा', 'गुंता मनाचा', 'स्वरगंध मातीचा', 'मनातलं मन', 'दिलसे दिल तक' असा कडक उन्हाळ्यात मे २०१५ मध्ये शब्दांचा पाऊस पाडून पद्य आणि गद्य, मराठी आणि हिंदी अशा साहित्याचा प्रपंच थाटला. किती उंच उडी, कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
पंधराव्या वर्षी विवाहित झालेली अनपड वाटणारी राधा ही राधिका अनपट झाली. एक लेखिका, दमदार कवयित्री झाली. तिच्या शब्दरूपी पावसानं माणसांची मनं चिंबचिंब व्हावीत, ओसाड रानी हिरवळ पसरावी, सुकलेल्या झाडांना पालवी फुटावी, नवकळ्यांनी फटाफट उमलून जावे, फुला फळांना अन् वेलींना बहर यावा, सांजवेळी गायींनी हंबरावं, वासरांनी हुंदडाव, अंधार चिरून पहाट व्हावी, किलबिल पक्षांनी प्रभात गाणी गावी, मंदीरी घंटानाद व्हावा, माणसातला माणुस जागा व्हावा, नात्यागोत्याचा जिव्हाळा टिकावा, जीवला जीवाची जाण व्हावी, प्रेमान प्रेम उसळून याव, श्रध्दा, भक्ती ठाम असावी, निसर्ग सौंदर्य, निसर्ग प्रेम, माणसांच्या भाव भावना, प्रेम, विरह, सलगी, उदात्तमनं याची जाणिव पाषाणाला पाझर फुटावा असा ओलावा असा जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद 'गुंता मनाचा' या काव्यसंग्रहाच्या रूपानं कवयित्री राधिका दिसुन येते खरंच किती उंच उडी.
(प्रस्तावनेतून)