सेक्रेटरी डॉट कॉम (Secretary Dot Com)
ebook ∣ (कथासंग्रह) (Collection of Stories)
By अलका कोठावदे (Alka Kothawade)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
पद्य लिहिता लिहिता गद्य लिहिण्याचा परिपाठ करणारी लेखिका म्हणून सौ. अलका कोठावदे यांचा उल्लेख करणे येथे संयुक्तिक ठरेल. विविध मासिकांमधून, दिवाळी अंकामधून आपल्ये कथा कविता वाचकांपुढे आणणाऱ्या अलका कोठावदे यांचा हा पाहिलाच कथासंग्रह. यांच्या लेखनाची काही वैशिष्ठे आहेत, शब्दांचा सोस नसलेली ओघवती भाषा, चपखल शब्दयोजना, निरीक्षण शक्ती आणि चित्रदर्शी शैली यामुळे सौ. अलका कोठावदे यांच्या या कथांकडे आपण सहज ओढले जातो. लेखिकेचे कुटुंबवत्सल असणे हे या कथांमधून डोकावते. स्त्रीकेंद्री कथांमध्ये अनुभवाचे पदर, त्यातील ताणतणाव, भावात्म पातळीवरील आंदोलने आणि सामाजिक/कौटुंबिक चौकटीतल्या क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त होत राहतात आणि म्हणूनच या कथांशी आपले बंध जुळून येतात. विनोद निर्मिती करतांना त्यात खट्याळपणा असावा लागतोच तो या कथांमध्ये दिसून येतो. मानवी जीवनाचे भावबंध यामध्ये व्यक्त होतांना दिसतात त्यामध्ये नर्म विनोदी आभास आपल्याला खरे वाटून जातात, हेच तर या कथांचे मर्म आहे. नितळ, पारदर्शी, संस्कारशील जीवनानुभवाचे ठसे स्पंदनशील आणि सचेतन असतात. कोऱ्या पाटीसारखं असलेलं मन अनुभवाच्या अक्षरमुद्रा कशा अधोरेखित करते हे या कथा वाचल्यावर आपल्याला समजून येईल.
उगाचच ग्रामीण भाषेचा अतिवापर करणाऱ्या कथांच्या या जमान्यामध्ये लेखिकेने आपल्या कथांमध्ये वेगळेपण जपले आहे. नाटकीय अतिरंजित अशा ग्रामपातळीवरील बेरकी, धूर्त, मतलबी संबंध, व्यसन-बाहेरख्यालीपणा या अपप्रवृत्ती, परस्परांतील हेव्या-दाव्यांचे, असूया-मत्सराचे प्रगटीकरण या कथांमध्ये दिसत नाही हे स्पृहणीय आहे. तरीही मानवी जीवनातील काळ्याकुट्ट ढगांना आढळणारी सत्प्रवृत्तींची सोनेरी कडा एक जगण्याचा भाग म्हणून या कथासंग्रहामध्ये आलेली दिसून येते. (प्रस्तावनेतून)