देवकी (Devaki)
ebook ∣ (कथासंग्रह) (Collection of Stories)
By डॉ. सदानंद सीताराम पाटील (Dr. Sadanand Sitaram Patil)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
समुपदेशनाच्या निमित्ताने माझ्यासमोर रोज नवनवीन विषय, नवीन समस्या, नवीन आव्हाने व्यक्ती-व्यक्तींच्या रूपाने येत असतात. काही अनुभव हृदयाचे ठोके चुकवण्याएवढे तिव्र असतात तर काही अनुभव स्वतः मलाच नवीन विचार, नवीन दृष्टी देणारे असतात. काही ऐकून लगेच विसरण्याजोगे असतात. तर काही विसरू म्हणता विसरता येत नाहीत असे दाहक आणि हृदयद्रावकही असतात. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तिमत्व घेवून जन्माला येत असते. त्या त्या व्यक्तीला मिळणारी संधी, अवकाश, परिस्थिती जशी उपलब्ध होते तसे व्यक्तिमत्व घडत जाते. कधी त्यात वारसाने आलेल्या बहुतांश गोष्टींचा परिस्थितीनुसार अर्थ लावून निश्चित अंदाज बांधावा लागतो व त्यानुसार प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून इप्सितापर्यंत पोहचावे लागते. दमछाकही होते बऱ्याचदा, कारण सर्वचजण काहीना काही लपवण्याचा प्रयत्न करत असतात. आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे पटवण्याच्या अट्टाहासापायी जे सत्य असतं ते मात्र आपसूकच झाकलं जातं, याचं भानही बहुतेकांना नसतं. म्हणूनच त्यांच्या हृदयात डोकावताना अनेक नवनवीन रहस्येही बाहेर पडतात.
काही-काही लोक साधे-भोळे असतात तर काहीजण तऱ्हेवाईक असतात. अशा वेळेला मन विषण्ण होते. अशा अनेक अनुभवांतून काही निवडक कथा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याआधी आपण जो उदंड प्रतिसाद दिलात तसाच 'देवकी'लाही द्याल असा विश्वास आहे. आणि रसिकांना विनंती आहे की 'देवकी'मधील लेखनाबाबत आपल्या प्रतिक्रीया आवर्जुन कळवा. (डॉ. सदानंद सीताराम पाटील)