वेंगुर्ले बोली आठवणीतील म्हणी आणि हुमाणी
ebook ∣ (Vengurle Boli Aathavanitil Mhani Aani Humani)
By श्रीराम मंत्री (Shriram Mantri)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
"वेंगुर्ले बोली-आठवणीतील म्हणी आणि हुमाणी", हे माझे मित्र श्रीराम मंत्री यांचे दुसरे पुस्तक. वर्षभरांतच पहिल्या पुस्तका पाठोपाठ आलेले. त्यांना आपल्या जन्मगावाबद्दल मनस्वी प्रेम व ओढ आहे, आणि आता मुंबईकर झालेलो असलो तरी जिथे आपली पाळेमुळे खोल गेलेली आहेत, अशा आपल्या जन्मभूमि बद्दलचा त्यांचा अभिमान, तसुभरही कमी झालेला नाही. मी प्रथमतः "वेंगुर्लेकर" आहे याचे भान न हरवलेले असे हे श्रीराम मंत्री. वेंगुर्ल्याची पंचक्रोशी, तिथली माती, निसर्ग, माणसें, संस्था, प्राचीन वास्तू, देवदेवस्की, दशावतार, खेळ, लोकजीवन हे लेखकाच्या रक्तातच जणू भिनलेले आहे. कोकणातल्या या भूप्रदेशाच्या गेल्या सात शतकांचा ऐतिहासिक वेध त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकांत घेतलाच आहे. "फकाणा - गजाली वेंगुर्ल्याचे" या त्याच्या पुस्तकाचे वेंगुर्लेकरांनी भरघोस स्वागत केले, अमाप कौतुक केले, आणि म्हणूनच की काय त्यांनी तिथल्या जित्या जागत्या लोकांच्या बोलीभाषेच्या अंतरंगात शिरण्याचा आता प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी मिळतील तेथून वेंगुर्ल्याच्या बोलीभाषेतील म्हणी आणि हुमाणी गोळा केल्या. सर्वसाधारण जनतेच्या तोंडी बसलेले हे धन तिथल्या आबाल वृध्दांच्या कानी सतत पडत असले तरी त्याला वाङ्मयीन प्रतिष्ठा देण्याचे मोलाचे कार्य या सरस्वती पुत्राने (मंत्र्याच्या आईचे नाव सुध्दा सरस्वती) केलेले आहे. अनोखे शब्द, चटकदार म्हणी त्यांच्या कुळकथा, त्यांचे निर्मिती प्रसंग, चपखल वाक्प्रचार, हुमाणी (कोडी किंवा घोटाळ्यात टाकणारे प्रश्न) यांचा या पुस्तकात त्यांनी अंतर्वेध घेतला आहे. कोकणी बोलीतली सानुनासिकता, गती व हेल ही कोकणी माणसाला जन्मजात लाभलेली लेणी. या लडिवाळ कोकणी बोलीच्या दागिन्या प्रमाणेच इतर बोलीच्या अलंकारांनीही आपल्या मराठी भाषा सजवलेली आहे.
मंत्र्याच्या या नवीन पुस्तकाने मराठी भाषेच्या समृध्दींत निश्चितच भर पडेल. कोकणी प्रांतातील "रुचि वैशिष्ट्ये" आणि "वृत्ति वैशिष्टये" त्यांनी आपलेपणाने जाणूनही घेतलेली आहेत, आणि म्हणूनच माझी माय सरसोती असे म्हणणाऱ्या बहिणाबाईप्रमाणे, लेखकाने आपल्या आईकडून मिळालेल्या मौलिक परंपरेचा वारसा मोठ्या अभिमानाने चालवून, पुढील पिढ्यांवर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत.
- डॉ. श्रीरंग आडारकर
(सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ, सारस्वत बँकेच डायरेक्टर, साहित्य, नाट्य, कला रसिक)