With an OverDrive account, you can save your favorite libraries
for at-a-glance information about availability. Find out more
about OverDrive accounts.
'मोरेवाडी इस्टेट' म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेला मोरेवाडी या खेडेगावाजवळील गोविंदराव मोरे या धनाढ्य सावकाराची दूरवर पसरलेली प्रॉपर्टी. या एकशेवीस एकर एवढ्या प्रचंड जागेत पसरलेल्या इस्टेटीत बंगला, गेस्टहाऊस, कित्येक लहानसहान घरं, बगिचे, फळबागा आणि बरंच काही आहे. या इस्टेटीवर आणि मोरेवाडी गावावर गोविंदराव मोरेंचं पिढीजात वर्चस्व आहे. अशा या मोरेवाडी इस्टेटीत झालेला खुनाचा सनसनाटी प्रयत्न आणि इस्टेटीतच दबा धरून बसलेला अज्ञात गुन्हेगार यांचा पर्दाफाश करण्यासाठी डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांना पाचारण करण्यात आलंय. या सगळ्याचा शोध घेत असताना अनेक रहस्यमय घटनांची मालिका तिथे घडत जाते आणि मोरेवाडी इस्टेटीचं गूढ आणखीनच गडद होत जातं.