घामाचा दाम (Ghamacha Dam)
ebook ∣ (झाडीबोली काव्यसंग्रह) (Collection of Poems in Zadiboli Dialect)
By डोमा कापगते (Doma Kapgate)
Sign up to save your library
With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.
Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

Search for a digital library with this title
Title found at these libraries:
Library Name | Distance |
---|---|
Loading... |
'घामाचा दाम' हा अस्सल झाडीबोलीतील कवितांचा संग्रह आहे. या संग्रहाला दुजोरा देताना मला बारा वर्षांपूर्वीचा काळ आठवतो. एक तपापूर्वी झाडीबोलीचा शब्द तोंडातून काढणे ही अप्रतिष्ठेची गोष्ट समजली जायची. या बोलीत बोलणारा 'गावंढळ' या शब्दाने ओळखला जायचा. म्हणूनच अनेक तथाकथित सुसंस्कृत म्हणविणारे लोक या चळवळीला नाके मुरडायचे हा एक नसता उपद्व्याप आहे असे म्हणून या चळवळीची थट्टा उडवायचे. पण बारा वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आणि त्याबरोबर अनेक गैरसमजदेखील!
उपेक्षितांना स्वतःचे व्यासपीठ निर्माण करून देणे, उपेक्षित प्रतिभावंतांचा शोध घेणे आणि त्यांना प्रकाशात आणणे, या तीन मह त्याच्या उद्दिष्टांचा त्रिशूळ हातात घेऊन ही चळवळ परंपरागत गैरसमजांचा नायनाट करायला निघाली आहे. याच प्रयत्नातून अंजनाबाई खुणे हिच्या सारखी साठीची संसारीक महिला आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार अखिल मराठी मनास करू शकली. अशाच संशोधनातून बाहेर आलेले एक अन्य नाव आहे डोमा दुधरामजी कापगते!
डोमा दुधरामजी कापगते हे नाव ऐकून हा माणूस कवी असेल असे कोणास वाटेल? शिवाय पेहराव कसा? आखुड धोतर, जाडसा कुडता आणि डोक्यावर मुंडासेवजा फेटा! हे ध्यान तरी आजच्या कवीला शोभणारं आहे का? हो, हे ध्यान लक्षात येताच आपणास संत तुकाराम आठवेल. या कवीची जातकुळी तशी तुकारामाचीच ! प्रभुनामात मग्न राहणारा, स्वतः भक्तिगीते रचून गाणारा असा हा कवी आहे.
खेड्यापाड्यात फिरून प्रवचन-कीर्तनात आपले जीवन साध्य शोधणारा हा माणूस अभ्यासाकडे वळला, लेखनाकडे वळला आणि त्याच्या प्रतिभेने मोठा चमत्कार घडवून आणला. या फटिचर माणसाची एक-दोन नव्हे, पुरी एक डझन पुस्तकें प्रकाशित झाली आहेत. यावर कोणाचा विश्वास बसेल? पण हे सत्य आहे, सूर्यप्रकाशाइतके खरे आहे, झाडीबोली साहित्य चळवळी इतके कटूसत्य आहे.
या कवीची कविता झाडीपट्टीची असामान्य संपत्ती आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या दैनंदिन अनुभवाला महत्व देणारी कविता शेतकरी कामकरी यांच्या जीवनाशी एकरूप होते आणि त्याच्या चित्रणात आपले सार्थक मानते. (प्रस्तावनेतून)